मुंबई । देशातील सामान्यांना सर्वोच्च बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी रेपो दरात 25 बेस पॉइंट्स किंवा 0.25 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली. रेपो दरातील कपातीनंतर आता कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे.
गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच RBI ने रेपो दरात कपात केली आहे. यापूर्वी मे 2020 मध्ये रेपो दर 4 टक्क्यांवर आणण्यात आला होता. रेपो दराचा आढावा घेण्यासाठी RBI MPC ची बैठक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती, ज्याचा निर्णय RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला.
मल्होत्रा म्हणाले की, एमपीसीच्या निर्णयांचा देशातील सर्व नागरिकांवर परिणाम होईल. हे व्यापारी, अर्थतज्ज्ञ आणि सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. तसेच महागाई लक्ष्यानुसार राहते आणि ती खाली येऊ शकते असेही सांगितले.
रेपोमध्ये 0.25 टक्के कपात केल्यानंतर, तो 6.25 टक्क्यांवर आला आहे, जो पूर्वी 6.50 टक्के होता.दरम्यान अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता रेपो रेट कमी करुन रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Discussion about this post