रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरबीआयने सहाय्यक भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 650 सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या नोकरीसाठी तुम्ही opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2026 आहे. अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे RBI ने स्पष्ट केले आहे.
या आरबीआय कार्यालयांसाठी भरती
आरबीआयने चंदीगड, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथील त्यांच्या कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
पात्रता
रिझर्व्ह बँकेतील नोकरीसाठी इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्थानिक भाषा यायला हवी.
पगार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर बेसिक पे २९,००० रुपये मिळणार आहे. तुम्हाला इतर भत्ते मिळून एकूण ५८,५१४ रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स, मेन्स, लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
प्रथम, आरबीआयची अधिकृत वेबसाइट, rbi.org.in ला भेट द्या.
पॅनेल वर्ष २०२५ अंतर्गत सहाय्यक भरतीसाठी लिंक उघडा.
नोंदणी करा आणि तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळवा.
वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. फॉर्म सबमिट करा















Discussion about this post