रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. चांगल्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळणार आहे. आरबीआय लाइजन ऑफिसर भरती २०२५ अभियानाअंतर्गत ४ पदांसाठी भरती केली जाणा आहे.या भरती मोहिमेचे उद्दिष्ट अनुभव कर्मचाऱ्यांची भरती करणे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मध्यवर्ती बँकेच्या उच्च नेतृ्त्व आणि विविध सरकारी आणि कायदा अंबलबजावणी संस्थांमध्ये संपर्क दुवे म्हणून काम करतील.
अर्ज कसा करावा?
आरबीआय बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्जाची कॉपी आरबीआय सेवा बोर्ड, मुंबई येथे जमा करायची आहे. याचसोबत सॉफ्ट कॉपी documentrbisb@rbi.org.in या मेलवर पाठवायची आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे.
अर्ज कोणी करावा?
या नोकरीसाठी अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असावा. या नोकरीसाठी ५० ते ६३ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावा. या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवाराने सेवानिवृत्तीआधी ५ वर्ष किंवा ३ वर्षे मुंबई सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा आरबीआयमध्ये काम केलेले असावे.याचसोबत उमेदवारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतून सेवानिवृत्त असायला हवे.
पगार
रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या अनुभवानुसार वेतन मिळणार आहे. १,६४,८०० ते २,७३,५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी पात्रतेनुसार पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंगद्वारे केली जाणार आहे. यानंतर व्हेरिफिकेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट केली जाईल. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
Discussion about this post