भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा बैठकीत अनेक निर्णय घेतले असून यात चेक क्लीअर करण्याचा कालावधी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या चेक क्लिअर करण्यासाठी एक-दोन दिवस लागतात. परंतु आरबीआयच्या निर्णयानुसार, आता हा वेळ काही तासांचा करण्यास सांगितले आहे. चेक क्लिअरन्सच्या प्रोसेसमध्ये सुधारणा आणि त्यातील जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांचा चेक क्लिअरन्सचा अनुभव सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.
याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेंट्रल बँकांना सूचना दिल्या आहेत.या निर्णयामुळे कोट्यवधी नागरिकाना होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक धोरण बैठकी काही तासांतच चेक सेटलमेंट करण्यास सांगितले आहे. चेक काही तासात स्कॅन, सबमिट आणि पास केला जाईल. त्यामुळे कामाची वेळ कमी होईल. याबाबत गाइडलाइन्स लवकरच जाहीर करण्यात येतील, असं आरबीआयने सांगितले आहे.
नवीन प्रणालीमध्ये चेक क्लीअर करण्यासाठी स्कॅन करणे, सादर करणे हे काम काही तासामध्ये करण्यास अनुमती दिली जाईल. सध्याच्या चेक ट्रानझॅक्शन सिस्टिममध्ये (CTS)दोन दिवसांमध्ये चेक क्लिअरन्स केले जाते.परंतु ही प्रक्रिया आता लवकर लवकर होणार आहे. ऑन रियलायजेशन-सेटलमेंटसह चेक क्लिअरिंग प्रक्रियेची कार्यक्षमता आणि प्रोसेसमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी हा नियम डिझाइन करण्यात आला आहे.















Discussion about this post