मुंबई । तुम्हीही जर क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहे. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. आरबीआय म्हटले की विशिष्ट नेटवर्कसाठी कार्ड जारी केले जाऊ नये आणि ते सर्व नेटवर्कला वापरण्याची परवानगी दिली जावी. या संदर्भात कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला
रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड संदर्भात आरबीआय नवीन नियम लागू करू शकते. यामागचे मुख्य कारण म्हणजे मास्टर, व्हिसा सारख्या आघाडीच्या कार्ड नेटवर्कमध्ये रुपे कार्डची एंट्री नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटले की सध्या कार्ड नेटवर्क आणि कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांचे हित पूर्णपणे विचारात घेत नाहीत.
व्यापारी आणि कार्ड जारी करणारी कंपनी यांच्यातील व्यवहार सुलभ करणे ही कार्ड नेटवर्कची भूमिका असली पाहिजे. कोणत्याही कार्ड नेटवर्कसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, ज्यासाठी शुल्क वसूल केले जाते. कार्ड जारीकर्ते कोणत्याही एका नेटवर्कशी संबंधित नसावेत, जेणेकरून इतर कार्ड नेटवर्कचे ग्राहक ते वापरू शकतील.
आरबीआयने हा निर्णय का घेतला?
कार्ड वापरून तुम्ही सहजतेने कोणत्याही व्यापाऱ्याला पैसे देऊ शकता. कार्ड नेटवर्क व्यापारी आणि कार्डधारक यांच्यातील व्यवहार सुलभ करते. कार्ड नेटवर्क एक प्रकारची पायाभूत सुविधा प्रदान करते, ज्यासाठी शुल्कही आकारते.
Discussion about this post