कल्याण – अखिल भारतीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष डाॅ.आर.बी.सिंह यांचे आजारपणामुळे नुकतेच फोर्टीज हाॅस्पिटल कल्याण येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
कै.डाॅ.आर.बी.सिंह यांनी राज्यव्यापी व देशव्यापी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी अनेक वर्षे त्यांच्या न्याय्य व रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संप,मोर्चे,साखळी उपोषणे,धरणे,आमरण उपोषणे रास्ता रोको आणि जेल भरो या सारखी आंदोलने राबवून व तसेच वेळोवेळी शासनाशी चर्चा घडवून शिक्षकेतर कर्मचा-यांना हक्काचा न्याय मिळवून दिला .
डाॅ.आर.बी.सिंह यांच्या पवित्र पार्थिवावर कल्याण पश्चिम येथील असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.