रावेर । आधी पतीने शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनतर पत्नीनेही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यात घडली असून याप्रकरणी निंभोरा व रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४), प्यारीबाई सुकलाल चव्हाण (वय ४२, रा. बेलखेडा, मध्यप्रदेश) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण या प्रौढाने भोकर नदी जवळील एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रविवारी दिनांक ९ जून रोजी आढळून आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या दिवशी खिरोदा प्र. रावेर गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नथ्थु महाजन यांच्या शेतात प्यारीबाई सुकलाल चव्हाण या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शेतमालक कमलेश महाजन यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करन्यात आली आहे.
पती पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, सतिश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली. दरम्यान या आत्महत्यांमुळे रावेर तालुका हादरला असून दोघांच्या मृत्यूबद्दल हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.















Discussion about this post