सावदा : रावेर तालुक्यातून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. सावदा ते कोचुर दरम्यान महामार्गावर झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. वीरेंद्र सुनील वीरेंद्र नेमाडे नेमाडे (वय २७) आणि अनिल चुडामण मेढे (वय ६५) अशी मयतांची नावे आहेत.
नेमाडे आणि मेढे हे दुचाकीवरून (एम.एच.१९ एबी ११०१) जात होते. त्याच वेळी त्यांची धडक चारचाक (एमएच १९ डीएम ०३५१) सोबत्त झाली. त्यात दुचाकीवरील दोघांच मृत्यू झाला. तर कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांन घटनास्थळी भेट दिली. मयतांना रावेन येथे नेण्यात आले होते.
रुग्णालयात मृतांच्या नातेवाइकांनी टाहो फोडला वीरेंद्र नेमाडे हे हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील बहीण असा परिवार आहे.
तर या प्रकरणी सावदा पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्र उशिरा सुरू होते.















Discussion about this post