रावेर । भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघात रावेर शहरातील तीन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सावदा-भुसावळ महामार्गावर पिंपरूळ नजिक घडली. तर या अपघातात दोघे गंभीर जखमी आहे.
या बाबत वृत्त असे की भुसावळ कडून सावदा मार्गे रावेर कडे येत असतांना एमएच २० सीएस ८००२ गाडी भरधाव वेगाने झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार (वय २५) मुकेश रायपूरकर (वर २३) व जयेश भोई हे जागेच ठार झाले. तर इतर गणेश भोई(फोटोग्राफर) सह अजुन एक गंभिर जखमी असुन जळगाव येथिल हॉस्पिटल मृत्यूशी झुंज देत आहे.
अपघाताची वार्ता रावेर शहरात पसरताच एकच खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे. कुठलातरी कार्यक्रम आटपून घरी येत असताना रात्री दोन वाजता पिंपरुड सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. हा अपघात इतका भीषण आहे की चार चाकी अक्षरशः गाडीचा चुराडा झाला आहे.
Discussion about this post