मुंबई । मुंबईतील नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. या मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिचे लचके तोडले आहेत.
मागील कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. अखेर मीरा भाईंदर पोलिसांच्या कारवाईत तिची सुटका झाली. तिच्यावर झालेली आपबिती ऐकून तपास अधिकाऱ्यांसह सर्वच जण सुन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय पीडित मुलगी ही मुळची बांगलादेशी आहे. अलीकडेच ती शाळेत नापास झाली होती. नापास झाल्यामुळे घरचे ओरडतील, या भीतीने ती घरातून पळून गेली होती. याच वेळी एका महिलेनं तिला गोड बोलून तिला भारतात आणलं. यानंतर ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
काही दिवसापूर्वी एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्यानं वसईजवळच्या नायगाव येथे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी 12 वर्षीय पीडित मुलगी आणि एका 20 वर्षीय महिलेची सुटका केली. याचवेळी, मोहम्मद खालिद बापरी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली.
Discussion about this post