मुंबई । राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच मुंबापुरी पुन्हा एकदा हादरी असून एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पीडितेनं स्वतः घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडित महिलेनं यासंदर्भात स्वतः पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करून पैसे घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं पीडितेकडे आणखी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.
महिला विवाहित असून काही घरगुती कारणांमुळे पतीसोबत राहत नसून एकटी राहत होती. याचा फायदा घेत आरोपीनं महिलेला या विषयावर तोडगा काढू असं सांगून तिला भेटायला बोलावलं. महिलेनं दिलेल्या जबाबानुसार हे दोघं एकत्र भेटले आणि आरोपीनं महिलेला वाईन देऊन त्यामध्ये काही पदार्थ टाकले, त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. याचाच फायदा घेत आरोपीनं महिलेवर बलात्कार केला. महिलेनं पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
Discussion about this post