जळगाव । लग्नाचे आमिष दाखवत तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना आता जळगावमधून समोर आलीय. ज्यात लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणाने १५वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिपेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार निखिल लिलाधर कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि आरोपी निखिल कोळी हे दोघे एकाच परिसरात राहतात. निखिलने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले.
मागील एक वर्षापासून त्याने मुलीच्या घरी आणि स्वतःच्या घरी तिच्याशी अनेकवेळा अत्याचार केले. यामुळे पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी निखिल कोळी याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post