राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आलीय. सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या १७ वर्षीय युवतीवर सुरेंद्रमुनी आणि त्याच्या साथीदाराने लैंगिक अत्याचार केली असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे युवती ८ महिन्यांची गरोदर आहे. यात आणखी एक आरोपीचा समावेश आहे. या अल्पवयीन पीडित मुलीवर सख्ख्या मामानेही वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.
रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर सुरेंद्र मुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी लैंगिक शोषण केले होते. वर्षभर मुलीवर नराधम लैंगिक अत्याचार करत होते. यामुळे पीडित युवती ८ महिन्यांची गरोदर राहिली होती. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर तिच्या सख्ख्या मामानेही लैंगिक अत्याचार केला आहे.
आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पीडित मुलगी मठात आपल्या मावशीसोबत राहत होती. पीडितेला झोपेतून उठवून ती सुरेंद्रमुनी तळेगावकर यांच्या खोलीत न्यायची. त्यानंतर पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तरूणीने विरोध केल्यानंतर तिला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली होती.
पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे भिंग फुटलं. अत्याचारातून तरूणी ८ महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर डॉक्टरांनी ही बाब लपवून ठेवली. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे बालकल्याण समितीने डॉक्टरांना नोटील पाठवली आहे. पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस तपासात पीडितेवर ३५ वर्षीय सख्ख्या मामानेही अत्याचार केल्याचं समोर आलं. या प्रकरणात चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस अधीक्षक विशाल आनंद पुढील तपास करीत आहेत.
Discussion about this post