विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. त्यानंतर संजीवराजे यांचे चुलत बंधू आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ‘व्हॉट्स अप’ला एक स्टेट्स ठेवले आहे.
केवळ 16 शब्दांचे त्यांचे हे स्टेटस राज्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे.
“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार” अशा आशयाचा हा स्टेटस आहे. यामाध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचा म्हटले जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्स नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाच्या पाच दिवसांच्या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत फक्त दोन लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ती रक्कम देखील आयकर विभागाने परत केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
Discussion about this post