मुंबई । एकीकडे राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाकरे बंधूंनंतर आणखी एका समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ऐक्याची हाक दिली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ऑफरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची चर्चा सुरु झाली आहे.
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना रिपाई ऐक्यासाठी साद दिली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर आम्ही एकत्र आलो पाहिजे. रिपाईच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. असेच आमचे प्रयत्न असणार आहे’.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येतील असे वाटत नाही. त्यांनी जरूर एकत्र यावे. ते एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल. ते एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही’.
Discussion about this post