मुंबई । एकीकडे राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली असून मात्र यातच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला होता. अशातच आता भास्कर जाधव शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
मला योग्य संधी मिळाली नाही, आज माझा वाढतं वय आहे. मला दुःख आहे, योग्य वेळेला मला जर संधी मिळाली असती तर हा भास्कर नावाप्रमाणे महाराष्ट्राला भास्कर दिसला असता, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सुचक इशारा दिला आहे. पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहे? पलीकडे जाऊन काय फायदा आहे ? जे कोण पक्ष सोडून जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे त्याची आपल्याला गरज आहे का?आता तिकडे एवढी एसटी फुल झाली आहे तिथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत. उदय सामंत त्यांच्या मनामध्ये काय आहे? मला माहित नाही. पण ते आदराने वागत आहेत, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याचं पहायला मिळतंय.
Discussion about this post