जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता एकनाथ खडसेंची सून खासदार रक्षा खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
रक्षा खडसे म्हणाल्या, एकनाथ खडसे यांनी या अगोदरही सांगितले होते की, त्यांना भाजपमध्ये यायचं आहे. मात्र, त्यांनी कधी यायचं आणि कधी नाही हे राज्यातील नेते देवेंद्र फडणीस आणि नड्डा जी ठरविणार आहेत. मात्र वेळ अजून ठरलेली नाही. भाजपामध्ये इतर पक्षातील मोठे नेते येत आहेत. मोदी यांचं नेतृत्व मान्य करत आहेत. त्यामुळे नाथा भाऊ पक्षात येतात यात काहीही विशेष नाही.
कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही
पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, गौण खनिज प्रकरणात आपल्याला नोटीस मिळाल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटल आहे. या विषयात आपण आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर सरकारने विचार करावा अस आम्ही शासनाला दिली आहे. त्याची फेर चौकशी होऊन जो निकाल येईल तो पर्यंत ही स्थगिती मिळाली असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post