जळगाव । यंदा महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या असून आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत. चार जून रोजी निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार, सभेदरम्यान काही ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याच नुसार
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत प्रचार रैली काढण्यात आली होती. त्यात ‘हिंदूराष्ट्र’ असे लिहिलेले पोस्टर दिसून आले होते. या प्रकरणी रावेरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रक्षा खडसे यांना नोटीस बजावली आहे.
रावेर येथे ९ मे रोजी खासदार राणा यांच्या उपस्थितीत खासदार खडसे यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅलीत हिंदूराष्ट्र असे नमूद केलेले पोस्टर दिसून आले आहे. ही बाब आचारसंहिता भंग करणारी असल्याची तक्रार झिया नोमानी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.















Discussion about this post