पुणे । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून येत्या 28 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या जागेवर कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अशातच राज्यसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मोठी घोषणा केली आहे.
आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असं शरद पवार म्हणालेत. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मविआचं जागा वाटप कधी होणार हे देखील शरद पवारांनी सांगितलं आहे. जागावाटप चर्चा चांगली झाली. जागा जिंकण महत्वाचं असलं तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हे महत्वाचं असतं. 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असं शरद पवार म्हणालेत.















Discussion about this post