फँड्री चित्रपटातू प्रसिद्धीच्या झोतात आलेली राजेश्वरी खरात हिनं आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारून बाप्तिस्मा घेतल्याची माहिती इन्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे.
बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. Baptism द्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते. राजेश्वरीने अशा प्रकारे एक फोटो शेअर करत तिच्या वैयक्तिक जीवनातले एक महत्त्वाचे पाऊल सर्वश्रृत केले आहे.
या फोटोमध्ये राजेश्वरी नदीच्या पाण्यात हात जोडून उभी असून, तिच्या डोक्यावर आशिर्वाद देतानाचा हात आहे. तिने फोटोला ‘Baptised’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
खरंतर जब्याची शालू अर्थात फँन्ड्री चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली. या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका बजावली होती. हा चित्रपट जातीभेदावर आधारीत असून, यात निखळ प्रेमाची देखील कहाणी आहे. या चित्रपटातून राजेश्वरीला खरी ओळख मिळाली.
Discussion about this post