नाशिक । नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा 18 वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. यावेळी आयोजित सभेत संबंधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांचे सरकार हे डरपोक सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आम्ही भोंग्यावर बोललो. त्यांनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे म्हणे हिंदुत्ववादी. या भोंग्यांचा मुस्लिमांना त्रास होतो. काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झालं. पण सरकारच ढिल्लं पडलं. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची. माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो, असे राज ठाकरे कडाडले.
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांवर देखील टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो? अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी पत्रकारांवर केली
Discussion about this post