मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये साधारणत: तासभर चर्चा झाली असून यावेळी भाजपकडून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भाजपच्या कोट्यातून ‘राज’पुत्राला विधिमंडळात पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. भाजप – मनसेमध्ये युती होणार का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण १२ जांगापैकी ५ जागा रिक्त आहेत.मात्र पाचपैकी काही जागा भाजपकडे आहेत. त्यातून अमित ठाकरेंची वर्णी लागू शकते.
महापालिका निवडणुकांना मदत करणार
दरम्यान, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची मदत घेण्याची भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच भाजप मनसेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातून महायुती म्हणून पाठिंबा देण्याचीही भाजपची तयारी होती. परंतु शिवसेनेमुळे तो प्लॅन फसला आणि अमित ठाकरेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर आता अमित ठाकरेंना परिषदेवर पाठवून त्या बदल्यात पालिका निवडणुकीत भाजप मनसेची मदत घेण्याची शक्यता आहे.
Discussion about this post