मुंबई । अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून यावेळी त्यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सत्तानाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. राज्यातील किळसवाणं राजकारण जनता येत्या निवडणुकीत बंद पाडणार का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होत असल्याचंही ते म्हणाले.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
Discussion about this post