नवी दिल्ली । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान, मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरु असून याच दरम्यान दोघांची ही भेट झाली.
राज ठाकरे दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांची आज सकाळी सर्वप्रथम भाजपा नेते विनोद तावडे यांनी भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे अमित शाहंच्या भेटीसाठी रवाना झाले. राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी शाह यांच्यासोबत दिल्लीत ही भेट घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही दिल्लीत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे त्यांचा पक्ष मनसेसाठी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांची मागणी करू शकतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेची ताकद सध्या फार दिसत नाहीय. पण महायुतीचे बळ मिळाल्यामुळे त्यांची शक्ती वाढेल तसच महायुतीला देखील राज ठाकरेंच्या रुपात एक फायर ब्रांड नेता, वक्ता मिळेल. त्यामुळे या युतीकडे सगळ्यांचच लक्ष आहे.















Discussion about this post