पनवेल | राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवलंय. त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार आहे. त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं. तर खर्च वाचला असता, असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टिपण्णी केली आहे.
पनवेल शहरात आज राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा पार पडत आहे. गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था या विषयांवर राज ठाकरे सध्या बोलत आहेत.
दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट झाल्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारले असता, त्यांनी ही अराजकीय भेट होती, अशी उत्तरं दिली होती. त्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल केली आहे.
“मी दिसलो का तुला गाडीमध्ये, मी झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे महाराष्ट्रात. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? असं विचारल्यावर अजित पवार म्हणतात महाराष्ट्राचा विकास करायचाय मला. अरे किती खोटं बोलता.”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांची नक्कल देखील केली.
Discussion about this post