मुंबई । जून महिना संपायला अवघा आठवडा उरला असून तरी देखील अद्यापही मान्सून सक्रिय झाला नाहीय. मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अशातच दडी मारुन बसलेला मान्सून पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
आजपासून पावसाची रिमझिम सुरु होणार असून 26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेत मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपुरात (Nagpur) कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post