पुणे । सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील काही भागात पाऊस कोसळत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या जिल्ह्यात कोसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी (१४ जुलै) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोरवाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४ दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार, असंही सांगण्यात आलं आहे.
Discussion about this post