जळगाव : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान आज शनिवारी जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने आज १६ सप्टेंबर रोजी दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात खान्देशातील नंदूरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, तसेच मुंबईतील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट विदर्भातील अमरावती जिल्ह्यास दिला आहे.
Discussion about this post