पुणे । एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली असताना यातच राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामाव खात्याकडून करण्यात आले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज?
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला आहे. याचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे. आधीच सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात पाऊस आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी अशी स्थिती आहे. अशामध्ये आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या २४ ते ४८ तासांत वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post