मुंबई : राज्यात मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून यामुळे राज्यात ऑरेंज आणि काही भागांना रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?
रायगड, रत्नागिरी, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. तर या ५ भागांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर बरसलेल्या दमदार सरींमुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक मार्ग बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुटी जाहीर करण्याचे केले आहे.
Discussion about this post