मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. मात्र मागच्या दोन आठवड्यापासून पाऊसाने विश्रांती घेतल्यानं उकाड्यात मोठी वाढ झाली होती. यामुळे नागरिक हैराण झाले. दरम्यान आता राज्यात पाऊस परतला आहे. राज्यात पावसाने कालपासून चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढत आहे.
पुढचे ३ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढच्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज कोकणसाह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणाला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाण्यासह पुण्याला मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. आज कुठे कसं हवामान असणार आहे जाणून घेऊया…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे शहरासह पुणे जिल्हा, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post