पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम आणि हलका पाऊस पडत आहे. पण आता पाऊस चांगला जोर धरणार आगामी चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल.’ राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावली. मुंबईच्या तुलनेत मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक होता.
मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे. रविवारी म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. तर मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.















Discussion about this post