मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. राज्यात पुढील पाच ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे..बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्यानं तिथं येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र असेल. त्या स्थितीचा फायदा होऊन राज्यात पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत कोकण गोव्यात हलका-मध्यम पाऊस मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह पडेल तर काही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ५ ते ७ सप्टेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Discussion about this post