जळगाव । गेल्या १५ ते २० दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे खानदेशात जोरदार पुनरागमन झाले आहे. मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. या पावसाने काहीसा दिलासाही मिळाला आहे.
खानदेशात यंदा जुलै व ऑगस्टमध्येही पावसाची तूट आहे. जुलैच्या अखेरीस पाऊस गायब झाला. कुठेही किंवा अपवाद वगळता मागील २२ ते २५ दिवसांत पाऊस झाला नाही. जूनमध्येही मध्यम पाऊस अनेक भागात होता. अनेक प्रकल्पही यामुळे यंदा रिकामे आहेत. नंदुरबारात जूनमध्ये २० टक्के पावसाची तूट होती. जळगावात जूनमध्ये सरासरीएवढा किंवा एकूण १२३ मिलिमीटर पाऊस झाला होता.
पण जुलैमध्ये पावसाने पाठ दिल्यासारखी स्थिती होती. या महिन्यात पाऊस नसतानाच ऊनही तापत होते. पिके फुलोरा अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने नुकसानही झाले. मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण व मध्येच ऊन असायचे. गोकुळाष्टमीला पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यात पाऊस आल्याने दिलासा मिळाला.
खानदेशात जळगाव, नंदुरबार, धुळेमध्ये बऱ्यापैकी स्वरुपातील पाऊस झाला आहे. जळगाव, धरणगाव भागात लहान नाले प्रथमच खळखळून वाहू लागले आहेत. जळगावच्या पारोळा तालुक्यात शेळावे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने चिखली नदीला पूर आलाय., चोपडा भागात गिरणा, तापी नदीकाठच्या शिवारातील जमिनी खरडून गेल्याचे प्रकारही घडले आहेत. तसेच शेतात पाण्याचा प्रवाह वाढल्याने ठिबकच्या नळ्या वाहून जाण्याचे प्रकारही झाले आहेत.















Discussion about this post