मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे आता महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने राज्यात ५ ते ९ जुलै पर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि उत्तर कोकणातील तुरळक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
पुढील चार दिवस कुठे हाय अलर्ट ?
6 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट , कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट
बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली : यलो अलर्ट
7 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
ऑरेंज अलर्ट :रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
8 जुलै: रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट
9जुलै : तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश
Discussion about this post