जळगाव : उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या जळगाव वाशियांसाठी साठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज शनिवारी (ता. ३) आणि रविवारी (ता. ४) मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
या काळात सोसाट्याचा वाऱ्याचा वेग तासाला ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सोमवारी (ता. ५) हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शनिवार, रविवार, बुधवारी (ता. ७) आकाश अंशतः ढगाळ, तर सोमवारी आणि मंगळवारी (ता. ६) आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल ३९ ते ४०, किमान २३ ते २४ अंश सेल्सिअस आणि वाऱ्याचा वेग तासाला २० ते २२ किलोमीटर राहील, असाही विभागाचा अंदाज आहे.