मुंबई । मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्ला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विशेष मागच्या काही दिवसापासून घामाच्या धारेनं हैराण झालेल्या जळगावकरांनाही दिलासा मिळणार आहे, आजपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो हवामान खात्यानं दिला आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीलाच दाखल झालेला मोसमी पाऊस काहीसा थांबल्यानंतर आता पुन्हा सक्रीय होणार आहे. प्रादेशिक हवामान विभागानं माहिती दिली आहे. पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे वेग घेईल. त्यामुळे राज्यात ३ ते ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
आज ऑरेंज अलर्ट कुठे कुठे ?
कोल्हापूर, सांगली, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली
येलो अलर्ट कुठे कुठे ?
सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
Discussion about this post