मुंबई । राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यातच पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Discussion about this post