पुणे । देशासह महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या वातावरण बदल दिसत असून बहुतांशी ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय. मात्र याच वातावरणात आता बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे.
सोबतच राज्यातील तापमान येणाऱ्या तीन दिवसांत वाढेल अशी शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे रब्बी हंगामातील पिके काढण्याची लगबग सुरु असून मात्र यातच पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विदर्भात २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वार्तिवला आहे.
Discussion about this post