जळगाव | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईने जळगाव जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” जारी केला असून काही भागांत ताशी ५०–६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बचाव यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे व प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “प्रशासन सज्ज आहे, मात्र नागरिकांनीही जबाबदारीने वागून आपली काळजी घ्यावी,” असे आवाहन केले आहे.
Discussion about this post