महाराष्ट्रात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असून राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरी कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरण पावसाला पोषक बनले आहे. राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामानातील या चढ-उतारामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.















Discussion about this post