मु्ंबई : महाराष्ट्रात पावसासोबत वादळाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केलाय. ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांतील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.
हवामान खात्याने आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्धा यासह इतर आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांतील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.
Discussion about this post