पुणे । राज्यातील वातावरणात बदल झाला असून वाढत्या तापमान थंडी गायब झाली आहे. दिवसाचा तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.
नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post