मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात आज पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून आज सकाळपासूनच राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पुढील तीन चार दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. ड्रमायन, पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये आजही पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल.
पुढचे काही दिवस पावसाचे…
सोमवार आणि मंगळवारी पुन्हा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रायगड, रत्नागिरी इथे सोमवार, मंगळवारसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाण्यात मध्यम सरींचा अंदाज आहे तर रविवारीही मुंबईमध्ये पावसाचा जोर खूप नसेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अशात ठाण्यात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असेल.
Discussion about this post