मुंबई । देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यातच आता 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे. राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मोसमामध्ये पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसंच, आज कोकण आणि विदर्भात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.चंद्रपूरमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मुंबईत पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Discussion about this post