जळगाव । मागच्या काही दिवसापासून उन्हाच्या तडाख्याने भाजून निघणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असून राज्यात गारपीटसह अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. जळगाव जिल्ह्यातही गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले. दरम्यान आगामी काही दिवस राज्यात अवकाळचे सावट राहणार असून आज हवामान खात्याने १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये उष्ण आणि दमट हवामान असून दुपारी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तापमान 30 ते 34 अंशांच्या दरम्यान राहील.
राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यात ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा यांचा समावेश आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
Discussion about this post