पुणे । राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून यातच पुन्हा एकदा राज्यावर बेमोसमी पावसाचे संकट आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाने चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसायट्याचा वारासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने १ एप्रिल रोजी जळगावला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तापमान वाढले असून यामुळे दुपारनंतर प्रचंड ऊन तापत आहे. जळगावचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाडाही वाढला आहे.
Discussion about this post