मुंबई । राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असून यामुळे शेतकरी सुखावला आहे, दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या, आज कोकणात पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबईसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी
दरम्यान, आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यात देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.















Discussion about this post