मुंबई । येत्या काही तासात मान्सून राज्यात दाखल होणार असून त्यापूर्वी राज्यातील अनेक भागात आगामी चार दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये ८ ते १० जून दरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधीच राज्यातील बहुतांश भागात पूर्वमौसमी पाऊस झोडपून काढत आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात येत्या ८ आणि ९ रोजी बहुतांश भागात जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान ढगाळ वातावरण असलयाने राज्यामध्ये उन्हाचा चटका कमी होत आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.















Discussion about this post