जळगाव । ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाचे संकट अधिक तीव्र होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज जळगावसह परभणी, बीड, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला. बाकी संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट आहे. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. हेच नाही तर मुंबईसह अन्य भागात ढगाळ वातावरण झाले.
कालपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमामात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिकांची मातीमोल झाली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय.
जळगाव जिल्ह्यात २एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यानंतर १ आणि २ एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.















Discussion about this post